प्रायश्‍चित्त घेण्यासाठी साध्वींचे 63 तास मौन 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मे 2019

लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी या विधानांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि प्रायश्‍चित्त म्हणून 63 तासांचे मौन सुरू केले.

भोपाळ ः लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सोमवारी या विधानांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि प्रायश्‍चित्त म्हणून 63 तासांचे मौन सुरू केले.

आता "आत्म्याचा शोध' घेण्याची वेळ आली असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. प्रचारादरम्यान, महाराष्ट्र "एटीएस'चे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे, तसेच म. गांधीजी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना 72 तासांची प्रचारबंदी केली होती.

मी केलेल्या विधानांबद्दल प्रायश्‍चित्त घेण्यासाठी मी सोमवारपासून (ता.20) 21 प्रहरांचे मौन (63 तास) सुरू केल्याचे ट्‌विट प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadhvi Pragya vows to not speak a word till Lok Sabha election results are out