सई परांजपे यांना भाषांतर पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 25 February 2020

नवी दिल्ली - विख्यात निर्मात्या-दिग्दर्शिका सई परांजपे यांना २०१९ या वर्षाचा साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार जाहीर झाला. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’ या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादाबद्दल (आणि मग एक दिवस) परांजपे यांना हा सन्मान जाहीर झाला. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी ही माहिती निवेदनाद्वारे दिली. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

देशातील २३ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाची बैठक आज झाली. तीत अनुवाद पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका सई परांजपे यांना मराठीसाठी; तर कोकणीसाठी जयंती नायक यांना कृष्णा सोबती यांच्या ‘जयंतीनामा’ या हिंदी कादंबरीच्या अनुवादासाठी हा पुरस्कार मिळाला. हिंदीसाठी आलोक गुप्ता (सरस्वतीचंद्र); तर इंग्रजीसाठी सझैन डॅनियल (कुसुमाबले) यांना अनुवाद पुरस्कार जाहीर झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Paranjape announces translation award