मोदींनी माफी मागितल्यास त्यांना सलामच : कमल हसन 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर दक्षिणेमध्ये सर्वप्रथम कमल हसन यांनी त्याचे स्वागत केले होते. तसे ट्विटही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मागील काही दिवसांमध्ये कमल हसन यांच्या राजकीय भूमिकेमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, मध्यंतरी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेत आपला रंग भगवा नक्कीच नाही, असे विधान त्यांनी केले होते.

चेन्नई : सक्रिय राजकीय प्रवेशाचे संकेत देणारे दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी आज पूर्वीच्या भूमिकेवरून यू-टर्न घेत पंतप्रधान मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करून आपण मोठी चूक केल्याची कबुली दिली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी आपली चूक मान्य केल्यास मी त्यांना सलामच करेन, असे विधानही त्यांनी केले आहे. मोदींनी आपल्या चुकीचा स्वीकार करत नेतृत्वाची चमक दाखवून द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर दक्षिणेमध्ये सर्वप्रथम कमल हसन यांनी त्याचे स्वागत केले होते. तसे ट्विटही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मागील काही दिवसांमध्ये कमल हसन यांच्या राजकीय भूमिकेमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, मध्यंतरी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेत आपला रंग भगवा नक्कीच नाही, असे विधान त्यांनी केले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही त्यांनी भेट घेतली होती. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा नष्ट झाला नसल्याची अप्रत्यक्ष कबुलीच रिझर्व्ह बॅंकेने दिल्याने सरकार तोंडघशी पडले आहे. याच मुद्यावरून सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत असताना कमल हसन यांनीही मोदींवर टीका केली आहे. 
 
Web Title: 'Salaam No 2 For PM Modi If He Apologises For Notes Ban': Kamal Haasan