नवाज शरीफला विचारतंय कोण?- सलीम खान

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना तेथील नागरिक विचारत नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देईल? असा प्रश्न प्रसिद्ध बॉलिवूड पटकथा लेखक व अभिनेता सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी ट्विटरवरून विचारला आहे.

सलीम खान म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या मुद्यावर त्यांनी मुद्दा मांडायया प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे कोण लक्ष देईल. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव ‘बे-नवाज शरीर‘ ठेवायला पाहिजे. मिस्टर शरीफ माफी मागतो परंतु, ज्यांनी कोणी तुमचे नाव ठेवले आहे. त्यांनी जर तुमच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली तर ते तुमचे नाव ‘बे-नवाज शरीर‘ ठेवतील. त्यांनी नवाज शरीफ हे नाव ठेवून मोठी चूक केली आहे.‘

‘पाकिस्तानमध्ये तुमचे कोणी ऐकते का? लष्कर, संसद अथवा जनतासुद्धा तुमचे ऐकत नाही. हे सगळे सोडा तुमच्या कुटुंबातील तरी तुमचे ऐकतात का? खरंच, मोठा प्रश्न आहे,‘ असेही सलीम खान यांनी म्हटले आहे.

Web Title: Salim Khan hits out at Nawaz Sharif