"सपा वॉशिंग मशीन, तिथे संघी सेक्युलर होतात"

असदुद्दीन ओवैसी यांनी ही टीका केली आहे.
Asaduddin-Owaisi-AIMIM
Asaduddin-Owaisi-AIMIMesakal

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर राजकारण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर काही नेते अजूनही पक्ष बदलण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. नुकतेच ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. याशिवाय अनेक आमदार आणि कार्यकर्ते भाजप सोडून सपामध्ये दाखल झाले आहेत. आता भाजपचे अनेक आमदार सपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सपाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. यावर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी टीका केली आहे.

Asaduddin-Owaisi-AIMIM
UP : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींचा घुमजाव

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ट्विट केलं की, 'सपा हे वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये संघी धर्मनिरपेक्ष होतात. कल्याण सिंग, हिंदू युवा वाहिनीचे सुनील, स्वामी प्रसाद आणि आता हे... मुस्लिम सपा नेते त्यांना पोसतील आणि त्यांच्या 'सामाजिक न्यायासाठी' प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. बाकी बी-टीमचा टॅग आमच्यावर आहेच.

Asaduddin-Owaisi-AIMIM
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या खर्चात २९ टक्क्यांनी वाढ
Asaduddin-Owaisi-AIMIM
प्रचारासाठी उत्तर प्रदेशात भाजपची मोठी फौज, IT सेलही सज्ज

उत्तरप्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. या टप्प्यांतर्गत 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. 10 मार्चला निकाल लागणार आहे. ओवेसी आपल्या निवडणूक रॅलींमध्ये भाजप, बसपा आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधत आहेत. अलीकडेच एमआयएमने यूपी निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ओवेसी यूपी निवडणुकीत 100 जागा लढवणार आहेत. या यादीत 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com