'सप' नेते गायत्री प्रजापती यांना जामीन मंजूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रजापती यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना 15 मार्चला अटक करण्यात आली होती.

लखनौ - बलात्काराचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे (सप) नेते गायत्री प्रजापती यांना आज (मंगळवार) विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

बाल लैंगिक गुन्हे संरक्षण न्यायालयाचे (पॉक्सो) विशेष न्यायाधीश ओम प्रकाश मिश्रा यांनी गायत्री प्रजापती यांच्यासह विकास वर्मा आणि अमरींदर सिंह उर्फ मिंटू यांना जामीन मंजूर करण्यात आला. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रजापती यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना 15 मार्चला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. महिला व अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Web Title: Samajwadi Party Leader Gayatri Prajapati Arrested On Rape Charges, Granted Bail By POCSO Court