मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न द्या; समाजवादी पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी

Mulayam Singh Yadav
Mulayam Singh YadavSakal

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचं नुकतचं निधन झालं आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते 'नेताजी' या नावाने ओळखले जायचे. आता मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात येत आहे. (Samajwadi Party leader mulayam sinh yadav news in Marathi)

समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून मुलायमसिंह यादव यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी केली आहे. मुलायम सिंह यादव यांचे देशाच्या राजकारणात मोठं योगदान आहे.

Mulayam Singh Yadav
"बकरी ईद में बचेंगे, तो मुहर्रम मे नाचेंगे"; PM पदाच्या उमेदवारीबाबत विचारताच खर्गे वैतागले

55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. 1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com