भाजपनेत्याच्या मुलाकडून गोळीबारात सप नेत्याचा मुलगा ठार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

दुचाकींची धडक झाल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याने केलेल्या गोळीबारात सप नेत्याचा मुलगा ठार झाला आहे.

अलिगड (उत्तर प्रदेश) : दुचाकींची धडक झाल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्याने केलेल्या गोळीबारात सप नेत्याचा मुलगा ठार झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सचिन प्रजापती (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, तो सपचे नेते पुरणमल प्रजापती यांचा मुलगा आहे. प्रजापती हे आपला दुसरा मुलगा नरेंद्रसोबत दुचाकीवरून सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली.

अनेकांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

भाजपच्या स्थानिक नेत्याच्या मुलाच्या दुचाकीला प्रजापती यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्या वेळी दगडफेक आणि गोळीबार झाला. घटनास्थळी आलेल्या सचिनला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samajwadi Party leaders son shot dead in road rage case