
जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत बागू खान उर्फ समंदर चाचा ठार झालाय. दहशतवादी जगतात त्याला ह्युमन जीपीएस असंही म्हटलं जायचं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समंदर चाचासह आणखी एक पाकिस्तानी घुसखोरही एन्काउंटरमध्ये मारला गेलाय.