सांबित पात्रांनी व्हिडिओ शेअर करून केली मोदी सरकारची पोलखोल

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

- सांबित पात्रा यांनी एका कुटुंबासोबत जेवण करतानाचा व्हिडिओ केला शेअर
- व्हिडिओचा उज्वला गॅस योजनेशी संबंध जोडत नेटिझन्सनी केले ट्रोल

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा यांनी सोशल मीडियावर एका कुटुंबासोबत जेवण करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर स्वयंपाक करत असलेली स्त्री ही आपल्या आईसारखी असून या आईला आपले घर मोदींमुळे व्यवस्थित चालवता येत असल्याचा दावा त्यांनी या व्हिडिओत केला आहे. या व्हिडिओचा उज्वला गॅस योजनेशी संबंध जोडत नेटिझन्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

सांबित पात्रा यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत लिहले आहे की, पुरीतील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या वृद्ध विधवा महिला, ज्यांना तीन मुली आहेत. यातील दोन मुली दिव्यांग असून मुलगा मजूरी करतो. अशा वृद्ध आईसाठी घर बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पात्रांच्या या व्हिडिओमुळे त्यांची सोशल मीडियातून खिल्ली उडविण्यात उडवत हेच काय उज्ज्वला योजनेचे यश असा प्रश्न उपस्थित होत आहे. उज्ज्वला या योजनेतून गरिब महिलांना गॅस कनेक्शन देण्याची योजना आहे. पण, अजूनही गावात चुलीवरच स्वयंपाक होत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Sambit Patras Video Showing Woman Cooking on Earthen Oven Comes Under Fire