Sanatana Dharma Remark: उदयनिधीच्या वादग्रस्त विधानावरून इंडिया आघाडी टार्गेटवर, काँग्रेसकडून सारवासारव

सनातन धर्माची मलेरिया आणि डेंग्यूसोबत तुलना करताना याचा विरोध नव्हे तर तो नष्ट केला पाहिजे असं स्टॅलिन यांनी म्हटलं होतं.
Udayanidhi Stalin
Udayanidhi Stalin

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या एका टिप्पणीवरुन देशभरात वादळ उठलं. यावरुन भाजपनं थेट काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला टार्गेट केलं. पण आता आता काँग्रेसनं याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. (Sanatana Dharma Remark Congress clarification on Udayanidhi Stalin statement)

"आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्वधर्म समभाव ही काँग्रेसची विचारधारा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपले विचार मांडण्याचे स्वांतत्र्य आहे. आम्ही प्रत्येकाच्या मान्यतांचा आदर करतो," अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

Udayanidhi Stalin
Maratha Reservation: "सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची मागणी नाही, तर..."; जरांगेंनी राज ठाकरेंचा गैरसमज केला दूर

उदयनिधी सनातनवर काय म्हणाले होते?

सनातन उन्मुलन संमेलनात बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना नष्टचं केलं पाहिजे. आपण डेंग्यु, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करु शकत नाही, तर त्याला नष्टचं करायचं असतं. त्याचप्रकारे सनातन देखील नष्ट केलं पाहिजे, कारण सनातन धर्म हा समाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे"

Udayanidhi Stalin
ST Bank Sadavarte: सदावर्ते अडचणीत! पॅनेल प्रशासनानं एसटीच्या बँकेतून शेकडो कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप

भाजपची काँग्रेसवर आगपाखड

स्टॅलिन यांच्या या विधानानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काही सवाल उपस्थित करताना काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "सनातन धर्माची मलेरिया आणि डेंग्यूसोबत उदयनिधींनी तुलना केली तसेच याचा विरोध नव्हे तर तो नष्ट केला पाहिजे असं म्हटलं. (Latest Marathi News)

म्हणजे सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के भारतीयांच्या नरसंहाराचं ते आवाहन करत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडातील डीएमके एक प्रमुख पक्ष असून काँग्रेसचा दीर्घकाळ सहकारी आहे. त्यामुळं मुंबईतल्या बैठकीत सनातनवर टीका करण्याबाबतही एकमत झालं होतं का? असा सवाल मालवीय यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

Udayanidhi Stalin
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांची मागणी

काँग्रेसवर निशाणा

तसेच काँग्रेसवर निशाणा साधताना राहुल गांधीचं, 'नफरत की बाजार में मुहब्बत की दुकानं' हे विधान म्हणजे भ्रम आहे, घमेंडी आघाडीचं हे सत्य आहे. काँग्रेसचा हात सनातनविरोधी डीएमकेसोबत आहे, अशा आशयाचं एक क्रिएटिव्ह मालवीय यांनी ट्विट केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com