सरकार मराठा समाजाला चिथावणी देतय का? पोलिस भरतीवरुन संभाजीराजेंचा संताप

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 17 September 2020

उद्धव ठाकरे सरकारने १२ हजार ५०० जागांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे सरकारने १२ हजार ५०० जागांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी यावर नाराजी व्यक्त करत सरकारचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरु आहे. तसेच देशातसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशात पोलिस भरते करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न संभाजीराजे यांनी केला आहे. 

सरकारच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. सध्या पोलिस भरती करण्याचे वातावरण नाही. पोलिस भरती पुढच्या टप्प्यात घ्या, आताच का करायची गरज आहे. सरकारला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का? मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागेपर्यंत पोलिस भरती पुढे ढकला, असं संभाजी राजे म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते. 

 कोरोना लस कधी येणार? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेत दिली माहिती

महाराष्ट्र पोलिस दलात मेगाभरती होणार यावर आज शिक्कामोर्तब झालाय. याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालाय. महाराष्ट्र राज्य सरकार पोलिस दलात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार आहे. यामुळे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलिस दलात सहभागी होता येणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. 

कोरोनाकाळात पोलिसांनी केलेले अविश्रांत प्रयत्न आणि सर्व प्रकारच्या बंदोबस्तासाठी लागणारी गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांच्या रखडलेल्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल  12 हजार ५२ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व पदे शिपाई संवर्गातील असतील.राज्यात कित्येक वर्षांनी पोलिस भरतीचा निर्णय प्रत्यक्षात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केली. या निर्णयामुळे शिपायांची सर्व रिक्तपदे भरली जातील. 100 टक्के भरण्यात येत आहेत.

खासगी कंपन्यांकडून धरणे बांधावीत की नको?

सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे. आरक्षणातील गरजा लक्षात घेवूनच या नियुक्त्या केल्या जातील.
पोलिस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे भरली जाणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanbhajiraje criticize criticize government on maratha reservation issue