Sandeshkhali Case : 'संदेशखाली'प्रकरणी पीडित महिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची कोर्टाची परवानगी

Sandeshkhali Case : ‘संदेशखाली’प्रकरणातील पीडित महिलांना कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करत त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची परवानगी गुरुवारी दिली आहे.
Sandeshkhali Case
Sandeshkhali Caseesakal

Sandeshkhali Case : ‘संदेशखाली’प्रकरणातील पीडित महिलांना कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करत त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडण्याची परवानगी गुरुवारी दिली आहे.

संदेशखाली येथे अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकाविल्याची प्रकरणे उघड झाल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्या वकील प्रियांका टिब्रेवाल यांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणातील ८० पीडित महिलांना या खटल्यामध्ये सहभागी होत न्यायालयासमोर त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. त्याला न्यायालयाने परवानगी दिली.

Sandeshkhali Case
Twinkle Khanna Post : ट्विंकलनं नाव बदललं की मोठा निर्णय घेतला? महिला दिनाच्या पूर्व संध्येला 'त्या' पोस्टनं चर्चेला उधाण!

संदेशखाली प्रकरण उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत खटला दाखल करून घेतला होता. या प्रकरणी ८० महिलांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याने मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवगणम यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने पीडित महिलांना त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडण्याची परवानगी दिली.

या महिलांचे म्हणणे स्थानिक भाषांमध्ये असल्यास त्यांच्या प्रतिज्ञापत्राचा योग्य अनुवाद करण्याची, त्यातील मजकुराची सत्यासत्यता पडताळण्याची आणि त्या महिलांची ओळख पटविण्याची जबाबदारी न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर सोपविली आहे.

Sandeshkhali Case
UCO Bank IMPS Scam : ग्राहकांच्या खात्यात अचानक आले होते 820 कोटी! आता CBIकडून 67 ठिकाणी छापेमारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संदेशखाली येथील महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याबाबत अलख श्रीवास्तव यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर यावेळी सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सीबीआयला या प्रकरणी त्यांचे म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणी पुढील सुनावणी चार एप्रिल रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com