सानिया मिर्झाला करचुकवेगिरीबाबत समन्स जारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

हैदराबाद- टेनिसपटू सानिया मिर्झा हिला सेवा कर न भरल्याबाबत सेवा कर विभागाने नोटीस बजावली असून, 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे.

हैदराबाद- टेनिसपटू सानिया मिर्झा हिला सेवा कर न भरल्याबाबत सेवा कर विभागाने नोटीस बजावली असून, 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे.

हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी 6 फेब्रुवारी रोजी सानियाला समन्स बजावले असून, 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे. केंद्रीय अबकारी कायद्यातंर्गत हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. करचुकवेगिरी केली नाही हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे ही सादर करावी लागू शकतात. शिवाय, चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
 
नोटीसीमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही समन्सला प्रतिसाद दिला नाहीत. जाणीवपूर्वक गैरहजर राहिलात, पुरावे दिले नाहीत तर आयपीसीच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही शिक्षेला पात्र आहात.'

Web Title: Sania Mirza summoned for alleged service tax evasion