सॅनिटरी नॅपकिन झाले 'जीएसटी' मुक्त; जीएसटी कौन्सिलचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

सॅनिटरी नॅपकिन वर आधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. आता सॅनिटरी नॅपकिनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

वस्तू आणि सेवाकर परिषदेची 28 वी बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात जीएसटी कौन्सिलकडे मागणी लावून धरली होती. ती मागणी आता मान्य केली गेली आहे. 

सॅनिटरी नॅपकिन वर आधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. आता सॅनिटरी नॅपकिनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. सॅनिटरी नॅपकिनसह हस्तकलेच्या वस्तूंना जीएसटीतून वगळण्यात आले आहे. जीएसटी कौन्सिलने तब्बल शंभर जीवनावश्यक वस्तूंवरील कराला कात्री लावली आहे. 
 

वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या 28 व्या बैठकीत 18 टक्केहून 12 टक्के आणि 28 टक्केहून 18 टक्के असा जीएसटी शिथिल करण्यात आला आहे. इथेनॉलवरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 5 कोटी वा त्याहून अधिक टॅक्स भरणाऱ्यांना दर महिन्याला रिटर्न फाईल करावे लागेल. अनेकांकडून सॅनिटरी नॅपकिनहून जीएसटी हटविल्याने या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. 'पॅडमन' फेम अक्षय कुमारने ट्विट करत या निर्णयाविषयी आनंद व्यक्त केला आहे. 
 

 

 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  

Web Title: Sanitary Napkins GST Free GST Councils Decision