बेळगाव ग्रामीणमधून संजय पाटील, निपाणीतून शशिकला जोल्ले 

संजय सूर्यवंशी
सोमवार, 9 एप्रिल 2018

बेळगाव : बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील कोठून लढणार, हा प्रश्‍न आता निकालात निघाला असून, त्यांना त्यांच्या सध्याच्या मतदार संघातून तिकीटावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवाय अपेक्षेनुसार निपाणीतून शशिकला जोल्ले भाजपच्यावतीने रिंगणार राहणार आहेत. भाजपने त्यांची पहिली 72 जणांची यादी रविवारी रात्री उशिराने जाहीर केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील 18 पैकी 10 विद्यमान आमदारांची नावे आहेत. 

भाजपने पहिली यादी जाहीर करताना त्यामध्ये विद्यमान आमदारांना प्राधान्य दिले आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजपच्या निवडणूक समिती सभेत ही यादी जाहीर करण्यात आली. केंद्रीयमंत्री जी. पी. नड्डा यांनी पहिली यादी जाहीर केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. जो निवडून येण्याची क्षमता ठेवतो, अशा उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल, असे बंगळूर दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमीत शहा यांनी जाहीर केले होते. कुडचीचे आमदार पी. राजीव जे पूर्वी बीएसआरमध्ये होते त्यांना यावेळी भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषीत करण्यात आले. पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या मतदार संघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे तेथील नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील पहिल्या यादीतील उमेदवार 
बेळगाव ग्रामीण - संजय पाटील 
निपाणी - शशिकला जोल्ले 
अथणी - लक्ष्मण सवदी 
कागवाड - भरमगौडा ऊर्फ राजू कागे 
कुडची - पी. राजीव 
रायबाग - दुर्योधन ऐहोळे 
हुक्केरी - उमेश कत्ती 
अरभावी - भालचंद्र जारकीहोळी 
बैलहोंगल - डॉ. विश्‍वनाथ पाटील 
सौंदत्ती - आनंद विश्‍वनाथ मामनी 

Web Title: Sanjay Patil from Belgaum rural, Shashikala Jolle from nipani