याला बेईमानी म्हणतात; मराठी पाट्यांवरून जलील यांच्या टीकेला राऊतांचे उत्तर

संजय राऊत यांनी भाजपवरही साधला निशाणा.
Sanjay Raut
Sanjay RautImtiyaz Jaleel

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी चौफेर फटकेबाजी केली. भाजपचे लोक भारत पाकिस्तानवर रोज बोलतात मात्र भारत चीनवर बोलत नाहीत. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपच्या नेत्यांचे डोळे तपासण्याची आवश्यकता आहे. तसंच महाराष्ट्रातील कारभार व्यवस्थित चाललाय असंही त्यांनी सांगितलं. आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर शिवसेना उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठीती भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली. राज्यात दुकानांवरी मराठी पाट्यांबद्दल घेतलेल्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी यावेळी उत्तर दिलं.

Sanjay Raut
Up Election 2022 : तिकीट वाटपाची सूत्रे पंतप्रधानांकडे

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काहीही नाही असं राऊत म्हणाले. भारत पाकिस्तानवर ते रोज बोलतात. मात्र भारत चीन बद्दल काहीही बोलत नाही. चीनने घुसखोरी केली आहे. सीमेवर परिस्थिती खूप चिंताजनक आहे असंही राऊत म्हणाले. तसंच आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उत्तर प्रदेशमधून 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sanjay Raut
'जोरदार धडक झाली, मोठ्ठा आवाज आला...'; बिकानेर रेल्वे दुर्घटनेचा थरार

इम्तियाज जलील यांच्या टीकेला उत्तर...

जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आपण ज्या राज्यात राहतो, ज्या मातीमध्ये खातो तिचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. इम्तियाज जलील असो किंवा व्यापारी असो त्यांनी अशी वक्तव्य करणं म्हणजे बेईमानी असल्याचं देखील ते म्हणाले. शिवसेनेचा जन्मच यासाठी झाला असून, मनसेच्या सल्ल्यावरून शिवसेना आपलं धोरण ठरत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com