esakal | #JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

#JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी

- "जेएनयूएसयू', "अभाविप' कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 

#JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली : नेहमीच विविध प्रकारच्या आंदोलनांमुळे चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्‌स युनियन (जेएनयूएसयू) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या दोन्ही संघटनांच्या दोन गटांमध्ये आज सायंकाळी तूफान हाणामारी झाली, यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या सभेमध्येच हा राडा झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या वेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशा घोष आणि अन्य विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पोलिस असताना विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते काठ्या, रॉड, हातोडे घेऊन फिरत होते, या वेळी काहीजणांचे चेहरे झाकलेले होते. या जमावाने विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशा घोष आणि तिच्या सहकाऱ्यांना रॉडने मारहाण केली, यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते काही संघसमर्थक प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेत घोषणाबाजी करत होते, असा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. 

यासंदर्भात नवीन माहिती मिळाल्यावर बातमी अपडेट होत राहील.