Sansad Ratna Awards 2025: १७ खासदारांना 'संसदरत्न' पुरस्काराने सन्मानित केले जाणार; जाणून घ्या, महाराष्ट्रातील कोण?

Sansad Ratna Awards News: लोकसभेतील त्यांच्या अनुकरणीय कामगिरीबद्दल या सर्व खासदारांना 'संसदरत्न' सन्मान-२०२५ ने सन्मानित केले जाणार आहे.
indian parliament emergency
indian parliament emergencysakal
Updated on

Sansad Ratna Awards and Maharashtra MP : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि  हे अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, लोकसभेतील अनुकरणीय कामगिरीबद्दल विविध पक्षांच्या १७ खासदारांना 'संसदरत्न' सन्मान-२०२५ ने सन्मानित केले जाणार आहे.

यामध्ये  सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), रवी किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप) आणि अरविंद सावंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह १७ खासदारांचा समावेश आहे.

या सन्मानांमध्ये सलग तीन टर्ममध्ये संसदीय लोकशाहीत त्यांचे सतत योगदान लक्षात घेऊन चार विशेष ज्युरी पुरस्कारांचाही समावेश करण्यात आला आहे. भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एन. के. प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी-सपा, महाराष्ट्र) आणि श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) यांना हा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

indian parliament emergency
sex in space : अंतराळात शारीरिक संबंध ठेवता येतात का अन् जर असं काही भलतंच घडलंच तर काय होईल?

या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून त्यांची सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली आहे. सन्मानित होणाऱ्या इतर खासदारांमध्ये स्मिता उदय वाघ (भाजप), नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.

indian parliament emergency
Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

समिती श्रेणीमध्ये, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्तविषयक स्थायी समिती आणि डॉ. चरणजित सिंह चन्नी (काँग्रेस) यांच्या अध्यक्षतेखालील कृषीविषयक स्थायी समितीला त्यांच्या अहवालांच्या गुणवत्तेसाठी आणि कायदेविषयक देखरेखीतील योगदानासाठी सन्मानित केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com