Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण

Murli Manohar Joshi : जोशी यांनी संस्कृतला भारताची संभाव्य राष्ट्रभाषा मानत, कामकाज संस्कृतमध्ये व्हावे यावर भर दिला. त्यांनी सांगितले की संस्कृत ही ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माची जागतिक भाषा आहे.
Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण
Updated on

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी 'विश्वगुरु' या शब्दाच्या वापरावर महत्त्वाचे भाष्य केले. त्यांनी स्पष्ट म्हटले की, "आपण सध्या 'विश्वगुरु' हा शब्द वापरू नये, कारण आपण आज विश्वगुरु नाही आहोत. आपण विश्वगुरु व्हायला हवे. पूर्वी आपण तसे होतो, पण आज आपण आहोत असे म्हणणे योग्य नाही." ते संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या 'संस्कृत भारती' या संस्थेच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com