संयुक्त किसान सभेचा २६ ला ‘बंद’ 

Delhi-Agitation
Delhi-Agitation

नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान सभेने, आंदोलनाला ४ महिने पूर्ण होत असल्यानिमित्त २६ मार्चला (शुक्रवारी) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. सरकारशी चर्चा करण्यासाठी किसान मोर्चाने नऊ सदस्यांची समिती स्थापन केल्याचाही स्पष्ट इन्कार करण्यात आला आहे. 

सरकारकडून २२ जानेवारीनंतर चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही व कायदे स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव किसान मोर्चाला मान्य नाही. त्यामुळे आंदोलनाची कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. देशात डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्या दरवाढीच्या विरोधात देशभरात आंदोलन तीव्र केले जाईल. दुसरीकडे शेतकरी नेते उद्यापासून (ता. १२) पश्‍चिम बंगाल, आसाम व केरळमध्ये जाऊन भाजपला मते देऊ नका, असे जाहीर आवाहन करणार आहेत. सोमवारी (ता.१५) भांडवलदार व धनदांडग्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल. रेल्वे स्थानकांवर रेल्वे खासगीकरणाच्या विरोधात निदर्शने करण्यात येतील. दिल्ली सीमांवरील आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या २८० शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकार दाखवीत असलेल्या संवेदनहीनतेचाही आंदोलनाने निषेध केला आहे.

किसान मोर्चाचे आगामी कार्यक्रम - 

  • १७ मार्च : प्रस्तावित ‘बंद’बाबत सर्व शेतकरी व कामगार संघटनांशी चर्चा. 
  • १९ मार्च : ‘शेती वाचवा’ आंदोलनात बाजार समित्यांमध्ये आंदोलने 
  • २३ मार्च : हुतात्मा दिनानिमित्त आंदोलनाची सूत्रे युवा शेतकऱ्यांकडे 
  • २६ मार्च : भारत बंद 
  • २८ मार्च : होळीनिमित्त देशात ठिकठिकाणी कृषी कायद्यांची होळी. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धमक्यांशी संबंध नाही
या आंदोलनात पुन्हा हिंसाचार घडावा या उद्देशाने ‘सारब्लोह रनलोमवरे’ या सॉप्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत संप तसेच धमक्‍या देणारे संदेश व्हायरल होत आहेत. आंदोलनाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही व आंदोलन अहिंसात्मक मार्गांनीच सुरू राहील, असा खुलासा शेतकरी संघटनांनी केला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com