सरबजीतच्या बहिणीचा भाजपमध्ये प्रवेश 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप आमदार सुरजीत ज्याणी यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दलबीर कौर यांनी याबाबत माहिती दिली.

फाजीका - पाकिस्तानमधील तुरुंगात मृत्यू पावलेले सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप आमदार सुरजीत ज्याणी यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दलबीर कौर यांनी याबाबत माहिती दिली.

पाकिस्तानमधील न्यायालयाने सरबजीत यांना हेरगिरी प्रकरणात शिक्षा सुनावली होती. तुरुंगात असताना काही कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. नंतर त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांना सोडविण्यासाठी दलबीर कौर यांनी खूप प्रयत्न केले होते. त्या वेळी त्यांचे भाजपशी संबंध आले, त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. 

Web Title: sarabjits sister dalbir kaur joins bjp