'पटेलांच्या पुतळ्याचा सोहळा म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा'

'पटेलांच्या पुतळ्याचा सोहळा म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा'

नवी दिल्ली : 'मोदीजी, तुम्हाला वाटत नाही का हा उद्घाटन सोहळा करणे म्हणजे एखाद्याच्या मरणाचा सोहळा साजरा करण्यासारखं आहे? तुम्ही नको असलेल्या पाहुण्यासारखे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी नक्की या. पण, आम्ही तुमचे स्वागत करणार नाही' अशा आशयाचे पत्र या प्रकल्पाच्या परिसरातील 22 गावांतील गावकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. या २२ गावातील ग्रामस्थांनी पंतप्रधान मोदींना या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे पत्र लिहिले आहे.

सरदार सरोवर परिसरात असणारी जंगले, नद्या, धबधबे, जमीन आणि शेती व्यवसाय आमच्यासाठी जगण्याचे साधन आहे. पण या प्रकल्पामुळे सगळं काही नष्ट करण्यात आले आहे आणि आता यासाठीचा सोहळा साजरा होणार असल्याबद्दल या पत्रात दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. आज सरदार पटेल जिवंत असते तर मुर्तीसाठी करण्यात आलेली धरण परिसरातील तोडफोड पाहून त्यांनाही रडू कोसळले असते. तसेच उद्घाटनाच्या संमारंभासाठी मोदी उपस्थित राहणार असले तरी गावकरी त्यांचे स्वागत करणार नाहीत, असेही गावकऱ्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. मोदीजी तुम्हाला सांगताना खूप दु:ख होतंय. पण जेव्हा तुम्ही सरदार पटेलांच्या मुर्तीच्या उद्घाटनासाठी अहमदाबादमध्ये याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करणार नाही. असे गावकऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. सरदार पटेलांच्या 143 व्या जयंतीदिनी त्याची पूर्ती होईल. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळील केवडिया कॉलनीतील साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. 90 हजार टन सिमेंट आणि 25 हजार टन लोखंड वापरून हा पुतळा उभारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com