#SareeTwitter : भारताची साडी ट्विटरवर भारी!

टीम ईसकाळ
बुधवार, 17 जुलै 2019

प्रियांका गांधी, प्रियांका चतुर्वेदी, बरखा दत्त, निधी राजदान, रेणुका शहाणे, गुल पनाग, दिव्या दत्ता, यामी गौतम या राजकारणी व सेलिब्रेटींनी आपले साडीतील फोटो #SareeTwitter हा हॅशटॅग देऊन शेअर केले आहेत.    

सोशल मीडियावर कशावरचं प्रेम उफाळून येईल सांगता येत नाही. मागील दोन दिवस झाले अचानक सोशल मीडियावर अनेक महिलांनी #SareeTwitter हा हॅशटॅह वापरून त्यांच्या आवडत्या साडीतील फोटो शेअर करायला सुरवात केलीये. पण ट्विटरवर हा ट्रेंड अचानक सुरू का झाला याचा अद्याप शोध सुरू आहे. साडी हा भारतीय पेहराव किती सुंदर आणि मनमोहक आहे हे समजण्यासाठी अनेक तरूणींनी आपले साडीवरचे फोटो शेअर केले आहेत.

या हटके ट्रेंडमुळे साडी जगभरात पोहोचलीये आणि या सुंदर पोशाखावर चर्चा सुरू झालीये. अनेक सेलिब्रेटींनी साडीतील सुंदर फोटो ट्विट करत #SareeTwitter, #SareeSwag असे हॅशटॅग दिले आहेत. केवळ अभिनेत्रींनीच नव्हे तर सोशल मीडिया सेलिब्रेटी आणि राजकारण्यांचाही या साडी ट्रेंडमध्ये सहभाग आहे. 

प्रियांका गांधी, प्रियांका चतुर्वेदी, बरखा दत्त, निधी राजदान, रेणुका शहाणे, गुल पनाग, दिव्या दत्ता, यामी गौतम या राजकारणी व सेलिब्रेटींनी आपले साडीतील फोटो #SareeTwitter हा हॅशटॅग देऊन शेअर केले आहेत.    

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saree twitter hashtag trending on twitter