
तिघींसोबत 15 वर्षे लिव्हइनमध्ये राहिला; झाली 6 मुले अन्...
अलीराजपूर : सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. लग्नाच्या संदर्भातील अनेक किस्से आपण आत्तापर्यंत ऐकले असतील पण असा किस्सा तुम्हा पहिल्यांदाच ऐकत किंवा वाचत असाल. मध्यप्रदेशमधील एका व्यक्तीने एका वेळी तीन महिलांसोबत लग्न केलंय. विशेष म्हणजे या लग्नात त्या महिलांचे प्रत्येकी दोन दोन मुलंही उपस्थित होते.
मध्यप्रदेशमधील आदिवासी भागातील ही घटना आहे. नवरदेवाने एका वेळी आपल्या तीन गर्लफ्रेंडसोबत लग्न केलंय. विशेष म्हणजे लग्नाच्या आधी हा व्यक्ती त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. लिव्ह इनमध्ये असताना त्या तीनही गर्लफ्रेंडला दोन दोन मुलं झाली होती. त्यानंतर त्याने त्या तीन महिलांसोबत आपलं लग्न लावून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे या लग्नसोहळ्यात त्याच्या सहा मुलांचा सामावेश होता.
हेही वाचा: सेक्स रॅकेटसोबतचे संबंध लपविण्यासाठी भाजप महिला नेत्याची हत्या, कुटुंबीयांचा आरोप
एकाच वेळी तीन महिलांसोबत लग्न करणाऱ्या या अवलियाचं नाव आहे समरथ मौर्य. त्याचे आदिवासी भागातील भिलाला समाजातील महिलांशी संबंध होते या १५ वर्षाच्या संबंधादरम्यान त्याला तीनही महिलांकडून सहा मुले झाली. असं म्हणतात की, या समाजात एखादा व्यक्ती एकापेक्षा जास्त महिलेसोबत संबंध ठेऊ शकतो आणि त्यादरम्यान त्यांना मुलेपण होऊ शकतात आणि त्यानंतर ते लग्नही करु शकतात. पण लग्नाच्या आधी ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत असं सांगितलं जातंय.
हेही वाचा: 52 रुपयांना बीअर अन् 350 रुपयाला रम; गुजरातमध्ये दारुचे भाव एवढे कमी?
समरथ मौर्य हा नानपूर या गावाचा माजी सरपंच असून तो मागच्या १५ वर्षापासून त्या महिलेंच्या संबंधात आहे. त्याची परिस्थिती गरीब असल्यामुळे तो लग्न करु शकला नाही म्हणून त्याने आता लग्न करायचा विचार केला असून आता त्यांना त्यांच्या समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळाली आहे असं समरथने बोलताना सांगितल.
दरम्यान मागच्या काळात समरथला या तीन महिला आवडू लागल्या आणि तो त्यानंतर त्यांना घरी घेऊन येत असे. पुढे त्याला तीनही महिलांकडून सहा मुले झाली आणि या लग्नात मुलेही सहभागी झाली होती. नानबाई, मेला आणि सकरी असं समरथच्या तीनही बायकांचं नाव आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
Web Title: Sarpanch Married Three Girlfriends With His Six Childs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..