काय सांगता... दहा रुपयांत मिळणार एलईडी बल्ब!

बाळकृष्ण मधाळे
Monday, 10 August 2020

आज राज्यात अनेक गावं विद्युत प्रकल्पापासून दूर आहेत. त्यांनाही आता नवी 'ऊर्जा' मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा बाकी असली तरी, ही योजना ग्रामीण भागासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

नवी दिल्ली : भारतातील एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ही कंपनी ग्रामीण भागातील 600 कोटी एलईडी बल्ब प्रत्येक तुकडीसाठी 10 रुपये दराने देण्याची योजना आखत आहे, असे एका वरिष्ठ कार्यकारी अधिका-यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी विद्युत प्रणाली ईईएसएल चालवत आहे. यानुसार 2014 मध्ये 310 रुपयांना सरकारच्या उजाला योजनेंतर्गत विकलेला एलईडी बल्ब आता 70 रुपयांना विकला जातो. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना हा बल्ब लवकरच केवळ दहा रुपयांमध्ये मिळणार असून कार्बन क्रेडिटमधून मिळणाऱ्या रिव्हेन्यूद्वारे उर्वरित 60 रुपये दिले जाणार आहेत.
तुम्ही पॉझिटीव्ह की निगेटीव्ह, आता साताऱ्यातच समजणार

कार्बन क्रेडिट्‌सचा क्‍लेम करण्याचा फायदा उजाला योजनेअंतर्गत दिला जातो. ही योजना सरकार व संयुक्त राष्ट्रांच्या स्वच्छ विकास यंत्रणा (सीडीएम) अंतर्गत चालते. दरम्यान, यासाठी चार हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत एक कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत. यामध्ये 600 कोटी ग्राहकांकडून तर उर्वरित रक्कम सदर रिव्हेन्यूतून मिळेल. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. ईईएसएल समूहाचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ कुमार यांची नुकतीच प्रसार माध्यमांमध्ये मुलाखत झाली.

व्याजवाडीच्या स्नेहलचा आयर्लंडमध्ये झेंडा, कोरोना लस संशोधनासाठी निवड 

त्यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रति एलईडी बल्ब 70 रुपयांना घेणे परवडत नाही. त्यामुळे या प्रस्तावित योजनेअंतर्गत आम्ही ग्राहकांचे जीवन प्रकाशमय करणार आहोत, तसेच या एलईडी बल्बला दहा रुपयांत देणार आहोत. दरम्यान, उजाला योजनेअंतर्गत 360 कोटी एलईडी बल्बपैकी केवळ 18 टक्के ग्रामीण भागात त्याचे वितरण झाले आहे. ग्राम उजाला योजना ग्रामीण भागातील ऊर्जा प्रवेश सुधारण्यास मदत करेल, एलईडी बल्ब निविदा काढण्याच्या अनिवार्य देशांतर्गत उत्पादनाच्या कलमामुळे जागतिक पुरवठा साखळींचा अविभाज्य भाग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही वेग देण्यात आला आहे, कारण कंपन्या चीनच्या बाहेर उत्पादन रेषेत हलविण्याचा विचार करीत आहे. वुहानमध्ये उद्भवलेल्या कोरोना साथीचा रोग सर्व देशभर पसरला आहे, त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

#MondayMotivation अपंगत्वावर केली मात, त्या कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!

या नव्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा कोटी एलईडी बल्ब देण्यात येणार आहेत. तसेच जेव्हा ही योजना सीडीएमच्या अंतर्गत नोंदणीकृत होईल, तेव्हा आम्ही ग्राम उजाला सुरू करू, असेही कुमार यांनी सांगितले. ईईएसएलच्या मते, सध्या भारत मूल्यानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलईडी मार्केट आहे. उजाला योजनेमुळे 9428 मेगा वॅटची उच्च मागणीची मागणी टाळता येऊ शकते, असे त्यांनी शेवटी नमूद केले. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनेतला होणार असून आर्थिक बचत होणार आहे. आज राज्यात अनेक गावं विद्युत प्रकल्पापासून दूर आहेत. त्यांनाही आता नवी 'ऊर्जा' मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा बाकी असली तरी, ही योजना ग्रामीण भागासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 600 Million Led Bulbs To Be Sold For Rs10 A Piece In Rural Areas