भाजपचा हा दिग्गज नेता म्हणताे, ...तर पुढची 25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही

भाजपचा हा दिग्गज नेता म्हणताे, ...तर पुढची 25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण नाही

कऱ्हाड : मराठा समाजाच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय गेल्यास कोणतेही सरकार आले तरी पुढची 20-25 वर्षे मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. सुप्रिम कोर्टात 50 टक्केच्यावर आरक्षण देण्याचा मुद्दा आहे. तेथे सरकारने भक्कम बाजु मांडण्याची गरज आहे. मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या जीवन मरणाची ही केस आहे. त्यामुळे या प्रश्नी सरकारच्या बरोबर राहिले पाहिजे या मताचा मी आहे, अशी स्पष्टोक्ती माजी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरुवार) येथे दिली.
पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ; भाजप आनंदीत
 
कृष्णा रुग्णालयातील कोरोना वॉर्डची पाहणी करुन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना शभेच्छा दिल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कृष्णा हॉस्पीटलचे डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले व डॉक्‍टर उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. या प्रश्नावर पाटील म्हणाले, मराठा समाजाला न्यायालयात दाखल असणारी केस नीट चालेल की नाही याची भिती आहे. न्यायालयात निर्णय विरोधात गेला की कोणतेही सरकार आले तरी 20 ते 25 वर्षे आरक्षण देता येणार नाही. मराठा समाजातील तरुण-तरुणींच्या जीवन मरणाची ही केस आहे. त्यामुळे ही केस व्हर्च्युअल कशी चालणार याबाबत शासनाने विचार करायला हवा. घटनेच्या चौकटीत मागास आयोग झाला आणि आयोगाला मराठा समाज मागास वाटला. त्यामुळे तो विषय आता राहिलेला नाही. मग सुप्रिम कोर्टात 50 टक्केच्यावर आरक्षण देण्याचा मुद्दा चालणार आहे. 50 टक्केच्यावर तामीळनाडु सारखी अनेक राज्य गेली आहेत. ते न्यायालयात मांडण्याची गरज आहे. या महत्वाच्या प्रश्नी सरकारबरोबर राहिले पाहिजे या मताचा मी आहे.

आमदार राेहित पवार यांच्या एंट्रीनंतर आणखी काेणा काेणाला मिळाली संधी, वाचा सविस्तर

सरकारने अचानक कप्पील सीब्बल यांना केस दिली. कुणाला केस द्यायची हा सरकारचा विषय आहे. मागास आयोगाचा अहवाल हा पाच हजार पानी आहे. वर्षभर सर्वेक्षण केल्यानंतर तो अहवाल आला आहे. कपील सिब्बल यांनी तो वाचला आहे का ? मी तो वाचला आहे. त्यामुळे मी डीबेटसाठी तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात येणार आहे, असे सांगत आहेत. तरीही ओबीसींना अस्वस्थता का वाटत आहे. त्यावर ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता नव्याने आरक्षण देण्याची कार्यवाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांनी ते आरक्षण व्यवहारात आणले. सध्या ओबीसी नेत्यांना अशी का भिती वाटते हे त्यांनाच माहिती. कऱ्हाडच्या विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या गैरसोयीबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, चार महिने कोरोनाचा विषय सुरु आहे. प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांना या प्रक्रीयेत सामावुन घेतले पाहिजे. त्यातुन चांगल्या सुविधा देण्यात येतात हे मी हिंजवडीला करुन दाखवले आहे. लक्षण नसलेल्या रुग्णांना घरी व्यवस्था असेल तर घरी ठेवले जात आहे. मी पुण्यात संस्थांना, गणेश मंडळांनी परिसरातील लॉज, कार्यालयांत रुग्णांची सोय करुन प्रशासनाचा भार कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. सरकारने व्यवस्था केली पाहिजे हे बरोबरच आहे. मात्र समाजानेही आता यातील काही भार उचलण्याची आवश्‍यकता आहे. 

अकरावी प्रवेशासाठी मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

शेट्टींच्या म्हणण्याला काय महत्व ? 

भाजपचे दुध आंदोलन हे मतलबी आंदोलन, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांनी केली आहे. त्यावर पाटील म्हणाले, मतलबी कोण आहे सर्वसामान्य शेतकरी जाणतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आमचे आंदोलन मतलबी वाटते का हे महत्वाचे आहे. राजु शेट्टी काय म्हणतात याला काय महत्व नाही. माध्यमे त्यांना प्रसिध्दी देतात त्यामुळे ते बोलतात. खासदार शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन करता आणि त्यांच्या घरी जेवायला जातात याला काय अर्थ आहे. त्यामुळे शरद पवार सुतासारखे सरळ आले म्हणायचे की हे शरण गेले समजायचे ? असा टोलाही त्यांनी यावेळी श्री. शेट्टी यांना लगावला. 
Video : अन् स्वाभिमानीच्या आंदोलकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

Edited By : Siddharth Latkar

पवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com