esakal | पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हीच ती वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हीच ती वेळ

भाजपकडून काँग्रेसची सुरू असलेली मुस्कटदाबीविरोधात काँग्रेसचे सर्वच नेते सक्रिय झाले आहेत. भाजपाच्या या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (साेमवार, ता. 27) मुंबईतील राजभावनासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, हीच ती वेळ

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : विविध राज्यात लोकशाही पध्दतीने निवडल्या गेलेल्या काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड भेद याचा वापर करत आहे. त्यामुळे विरोधात बोलण्याची व लोकशाही वाचाविण्याची वेळ आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. 
कृष्णा नदीवर नवीन पूल; 13 कोटी मंजूर
 
आमदार चव्हाण यांनी याबाबत व्टिटरवर केवळ आपले मतच मांडलेले नाही तर भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात भाजपच्या या भुमिकेमुळे लोकशाहीच अडचणीत आली आहे. राज्यांमध्ये लोकशाही पध्दतीने निवडलेली काँग्रेसची सरकारे पाडण्यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आहे. देशातील प्रत्येक संभाव्य संस्था ताब्यात घेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे आता याविरोधात भुमिका घेण्याची आणि लोकशाही वाचविण्याची वेळ आली आहे.

सातारा काेणती दुकाने सुरु राहणार अन् काय बंद राहणार वाचा सविस्तर
 
दरम्यान, सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून भाजप विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये भाजप लोकशाहीची हत्या करू पाहत आहे. भाजपकडून काँग्रेसची सुरू असलेली मुस्कटदाबीविरोधात काँग्रेसचे सर्वच नेते सक्रिय झाले आहेत. भाजपाच्या या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (साेमवार, ता. 27) मुंबईतील राजभावनासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सातारा पोलिस दलावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रकल्प नको तर, जनतेला सेना नको  कोणी दिला इशारा वाचा....