Revathi police witness Sathankulam testimony
esakal
Sathankulam Custodial Death Case : सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर तामिळनाडूतील ‘साथानकुलम कोठडी मृत्यू’ प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायव्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या संपूर्ण प्रकरणात हेड कॉन्स्टेबल रेवथी (Revathi Witness Role) यांची भूमिका विशेष ठळकपणे समोर आली आहे. त्यांच्या धाडसामुळेच हा खटला निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला, असे मानले जात आहे.