`... तर काँग्रेसही ऑपरेशन हाती घेईल` 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला.

जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा मिळविल्यामुळे ऑपरेशन कमळचा प्रयत्न चालविला आहे. परंतु आम्हीही हात बांधून स्वस्थ बसणार नाही. तसे झाल्या आम्हीही ऑपरेशन मोहीम हाती घेऊ. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या पुन्हा मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर प्रतििक्रया देताना, नरेंद्र मोदी यांच्या  देशातील वर्चस्वामुळे आता हा अध्याय संपला आहे. यापुढे आम्हाला आता हायकमांडच्या सल्यानुसार वागावे लागणार आहे. २९ पासून भाजप ऑपरेशन कमळ सुरू करणार असल्याच्या वृत्तावर बोलताना, त्यावर ब्रेक लावण्यासाठी आपणही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मैत्री नेत्यांच्या आरोप- प्रत्यारोपामुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. अजून चार वर्षे आहेत. सर्व काही सुरळीत करण्यात येईल, असे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sathish Jarkiholi comment