
दिल्ली पोलिसांना पूर्णवेळ पोलीस आयुक्त मिळाले आहेत. वरिष्ठ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सतीश गोलचा यांची आज गुरुवारी नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी एसबीके सिंह यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ते फक्त २० दिवस आयुक्तपदावर राहू शकले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याच्या ३० तासांच्या आत त्यांना पदावरून हटवण्यात आले.