कर्नाटकातील ऑपरेशन 'कमळ'च्या गळाला सात आमदार - सतीश जारकीहोळी

मिलिंद देसाई
सोमवार, 3 डिसेंबर 2018

बेळगाव - काँग्रेस पक्षातील सहा ते सात आमदार नाराज असून नजीकच्या कालावधीत ते भाजप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती माजी मंत्री आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज (ता.3) दिली. 

ऑपरेशन कमळ सुरू असल्याच्या वृत्ताला सतीश जारकीहोळी यांनी दुजोरा दिला असून काँग्रेस आणि धजद पक्षातील 25 आमदारांच्या संपर्कात भाजप आहे. पण, त्यापैकी 6 ते 7 आमदार नाराज असून नजीकच्या कालावधीत ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मी आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी पक्ष सोडणार नाही. पण, राज्यातील 6 ते 7 आमदार नाराज असून भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा पक्षाला धोका नाही. मात्र, काँग्रेस व धजदमधील नाराज 25 आमदार पक्ष बदल्यास सरकार अडचणीत येऊ शकते

- सतीश जारकीहोळी

Web Title: Satish Jarkiholi comment