Satna Former MLA House Case : सतना जिल्ह्यातील चित्रकूटचे माजी काँग्रेस आमदार निलांशू चतुर्वेदी यांच्या घरात गोळी लागून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणीचे नाव सुमन निषाद (वय २४) असून ती माजी आमदारांच्या घरात काम करत होती.