सत्या नाडेला ठरले शिल्पकार ; मायक्रोसॉफ्टचा महसूल 100 अब्ज डॉलरवर

Satya Nadela become a craftsman Microsofts revenue is 100 dollar billion
Satya Nadela become a craftsman Microsofts revenue is 100 dollar billion

रेडमंड : माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि सॉफ्टवेअर पुरवठादार "मायक्रोसॉफ्ट'ने तब्बल 100 अब्ज डॉलरचा महसूल कमवला आहे. कंपनीने जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने पहिल्यांदाच महसुलाचा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला असून, याचे शिल्पकार मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सत्या नाडेला ठरले आहेत. 

इंटेलिजंट क्‍लाउडमध्ये गेलेल्या भरीव गुंतवणुकीची मधुर फळे कंपनीला चाखण्यास मिळाली आहेत. नाडेला यांनी 2014 मध्ये मायक्रोसॉफ्टची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या समभागाचे मूल्य तीन पटीने वाढले आहे. मायक्रोसॉफ्टने इंटेलिजंट क्‍लाउड बाजारपेठेत आघाडी घेतली आहे. इंटेलिजंट क्‍लाउड, पर्सनल कॉम्प्युटिंग, सरफेस नोटबुक, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि सर्व्हर प्रॉडक्‍ट्‌सचा कंपनीची विक्री वाढण्यात महत्त्वाचा वाटा आहे. जूनअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात "मायक्रोसॉफ्ट"ला 100 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला आहे. 

कंपनीला जूनअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 30.1 अब्ज डॉलरचा महसूल मिळाला तर 8.9 अब्ज डॉलरचा नफा मिळाला. कंपनीच्या महसुलात 17 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. नफ्यात 35 टक्के वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. सरते आर्थिक वर्ष कंपनीसाठी उत्साहजनक ठरले. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध असून, त्यांच्या विश्‍वासामुळेच ही कामगिरी करणे शक्‍य झाल्याची भावना नाडेला यांनी व्यक्‍त केली आहे. इंटेलिजंट विभागातील गुंतवणूक फायदेशीर ठरली असून, यापुढेही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाला प्राधान्य राहील, असे नाडेला यांनी सांगितले. 

गुंतवणूकदार मालामाल 

कंपनीच्या चांगल्या कामगिरीने "वॉलस्ट्रीट'वर मायक्रोसॉफ्टच्या समभागाने नवी उंची गाठली. मायक्रोसॉफ्टचा समभाग काल (ता. 19) 4 टक्‍क्‍याने वधारून 108.50 डॉलरपर्यंत गेला होता. या आठवड्यात मायक्रोसॉफ्टचे बाजारभांडवल 800 अब्ज डॉलरवर गेले आहे. कंपनीने लाभांशच्या रूपाने तब्बल 5.3 अब्ज डॉलर गुंतवणूकदारांना दिले आहेत. त्याशिवाय मायक्रोसॉफ्ट बाजारातून समभागांची पुनर्खरेदी करणार असून, या योजनेत गुंतवणूकदार मालामाल होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com