
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ११ मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.