उपोषणात सत्येंद्र जैन यांचे वजन वाढले - कपिल मिश्रा 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजभवन येथे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या विरोधात उपोषण केले. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. लोकांना आम आदमी पक्षाने काय मागण्या किंवा प्रगती केली आहे हे जाणून घेण्यापेक्षा सत्येंद्र जैन यांचे वजन जाणून घेण्याबाबत अधिक उत्सुकता आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी राजभवन येथे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या विरोधात उपोषण केले. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. लोकांना आम आदमी पक्षाने काय मागण्या किंवा प्रगती केली आहे हे जाणून घेण्यापेक्षा सत्येंद्र जैन यांचे वजन जाणून घेण्याबाबत अधिक उत्सुकता आहे.

उपोषण काळात 2 ते 3 दिवसांनी प्रकृती स्वास्थ्य खालावते. परंतु  गेल्या 5-6 दिवसांपासून उपोषण करणारे आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे वजन 1.5 किलोग्रॅम इतके वाढले आहे. कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. मिश्रा यांनी ट्विट करत सहकार्यांवर निशाणा साधला आहे.

'सत्येंद्र जैन यांनी उपोषणात ही घोटाळा केला. चार दिवसीय उपोषणानंतर देखील वजन वाढले. जैन यांनी शुक्रवारी आरोग्य तपासणी करण्याचे टाळले. जर आरोग्य तपासणी झाली असती तर साखरेच्या प्रमाणावरून जेवण केले आहे की नाही हे सिद्ध झाले असते. त्यांनी दुपारी तपासणी करण्याची परवानगी दिली तेव्हा साखरेचे प्रमाण घटले होते परंतु वजन वाढल्याची पोलखोल झाली असल्याचे मिश्रा यांनी ट्विटमध्ये नमूद केले. तसेच ट्विटद्वारे त्यांनी उपोषणाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली.

Web Title: Satyendra Jains weight increased says Kapil Mishra