Saudi Arabia | एका ट्विटसाठी ३४ वर्षीय महिलेला ३४ वर्षांची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saudi Arabia

Saudi Arabia : एका ट्विटसाठी ३४ वर्षीय महिलेला ३४ वर्षांची शिक्षा

मुंबई : ट्विटर वापरल्याप्रकरणी सौदीतील एका महिलेला 34 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लीड्स युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरवर ट्विटरवर काही असंतुष्ट कार्यकर्त्यांना फॉलो केल्याचा आणि त्यांचे ट्विट रिट्विट केल्याचा आरोप आहे. सलमा नावाची ही महिला रजेवर घरी आली असता तिला 34 वर्षांची शिक्षा झाली होती. सौदी अरेबियातील विशेष दहशतवादी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा: Twitter vs Elon Musk : ट्विटर आणि मस्क यांच्या वादात आता भारत सरकारचा उल्लेख

34 वर्षीय सलमा ही दोन मुलांची आई आहे. सलमा अल-शहाबला यापूर्वी अशांतता निर्माण करण्यासाठी आणि नागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्यासाठी इंटरनेट वेबसाइट वापरल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. परंतु सोमवारी, तिला नवीन शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामध्ये 34 वर्षांचा तुरुंगवास आणि नंतर 34 वर्षांच्या प्रवास बंदीचा समावेश आहे.

हेही वाचा: Twitter Deal Ends: अखेर ट्वीटरची Elon Musk विरोधात कारवाई; केले गंभीर आरोप

सलमाने सोशल मीडिया अकाऊंट्सवर स्वत:ची ओळख डेंटल हायजिनिस्ट आणि पीएचडी विद्यार्थी म्हणून सांगितली आहे. ती प्रिंसेस नौरा बिंत अब्दुलरहमाव विद्यापीठात लेक्चरर आहे, तिचे ट्विटरवर 2500 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या खात्यावर कुटुंबाचे आणि मुलांचे फोटो आहेत.

Web Title: Saudi Arabia 34 Year Old Woman Sentenced To 34 Years For A Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TwitterSaudi Arabia