78 वर्षाच्या वृद्धाचा 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमाला गावकऱ्यांकडून चोप I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Crime News

बलात्काराच्या घटनांमध्ये 'हे' राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

Crime News : 78 वर्षाच्या वृद्धाचा 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

राजस्थानमधील (Rajasthan) सवाई माधोपूरमध्ये (Sawai Madhopur) अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. खंडार पोलिस ठाण्याच्या (Khandar Police Station) हद्दीतील घटनेनुसार, शनिवारी सायंकाळी उशिरा एका 78 वर्षीय वृध्दानं गावातील एका मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केलाय. या घटनेनंतर काही ग्रामस्थांनी त्या नराधमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पोलिसांनी (Rajasthan Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सायंकाळी घडलीय. बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार (FIR) आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, वृध्दानं मुलीला खंडार पोलिस स्टेशन हद्दीतील एका निर्जन स्थळी नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम मुलीवर अत्याचार करत असताना तिथून जाणाऱ्या काही लोकांना मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन वृद्धाला बेदम चोप दिलाय.

हेही वाचा: धक्कादायक! अर्भकाचे लचके तोडून कुत्र्यानं डोकं केलं धडा वेगळं अन्..

दरम्यान, आरोपी वृद्धाविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलिसांनी मुलीचा जबाब घेत तिची वैद्यकीय तपासणी केलीय. राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

Web Title: Sawai Madhopur 78 Year Old Man Rapes 12 Year Old Girl Arrested In Rajasthan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top