Say No To War : भारत-पाकच्या नागरिकांना नकोय युध्द 

Say No To War hashtag is viral on twitter
Say No To War hashtag is viral on twitter

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताकडून पाकिस्तानला मिळाले. पण जगाने समजावले असतानाही आज पाकने पुन्हा डोकं वर काढले. त्याचेही उत्तर भारतीय एअर फोर्सने पाकला दणक्यात दिले आहे. भारताकडून कोणतेही अधिकृत वृत्त आले नसले तरी विंग कमांडर अभिनंदन पाक सेनेच्या हाती लागले आहेत. मात्र दोन्ही देशांच्या सामान्य जनतेला आता हा तणाव नकोसा झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान वासियांना दोन्ही देशात उद्भवलेली युध्दाचे वातावरण नको आहे, हे सोशल मिडीयावरुन स्पष्ट होत आहे. 'से नो टू वॉर' (#SayNoToWar) असा हॅशटॅग सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे.

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानही आता नमती भूमिका घेत असल्याची परिस्थिती आहे. जर युध्द झाले तर, युध्दाचा परिणाम हा कुणासाठीच विजय ठरणार नसून दोन्ही देशांसाठी इतिहासातील सर्वात मोठे अपयश ठरेल, अशा भावना सध्या पोस्टद्वारे दोन्ही देशांचे नागरिक व्यक्त करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com