SBIच्या ATM मध्ये मिळणार 2000 च्या नोटा

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोलकता- देशातील सर्वात मोठी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सोमवारी रात्रीपासून एक हजार एटीएम सेंटर्समध्ये 2000 रुपयांच्या नोटा उपलब्ध होणार आहेत.

बँकेच्या अध्यक्षा अरुंधती रॉय यांनी ही माहिती दिली. "बँकिंग सेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. इतर उर्वरित एटीएम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचे प्रयत्न करीत आहेत," असे त्यांनी सांगितले. 
त्या म्हणाल्या, "सोमवारी रात्रीपासून आमच्या एक हजार एटीएम केंद्रांमधून 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा ग्राहकांना मिळू शकणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण तयारी झाली आहे."

सर्व एटीएम लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत. सध्या SBIच्या एटीएममधून फक्त 100 रुपयांच्या नोटा मिळत आहेत. एका एटीएम यंत्रामध्ये अशा फक्त 2500 नोटा ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे 125 लोकांनी नोटा काढल्या तर एटीएम मधील नोटा संपतात असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: SBI to calibrate 1,000 ATMs for Rs 2,000 notes by Monday