एसबीआयचा कर्जदारांना दिलासा; कर्जदरात कपात

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या कर्जदरात 0.15 टक्‍क्‍यांची कपात केली आहे. बॅंकेने 1 नोव्हेंबर, 2016 पासून नवे कर्ज दर लागू केले आहेत. त्यामुळे आता गृहकर्ज एसबीआयकडून गृहकर्ज, वाहनकर्जधारकांच्या मासिक हप्त्यात (EMI) बचत होणार आहे.

महिलांना गृहकर्जाच्या दरात अधिक सूट मिळणार आहे. यापूर्वी महिलांसाठी स्टेट बॅंकेने गृहकर्जाचा दर 9.25 टक्के होता. तो आता 9.10 टक्के करण्यात आला आहे. तर इतरांसाठी हा कर्जदर 9.15 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच रु. 50 लाखांचे तीस वर्ष मुदतीचे कर्ज घेतलेल्या कर्जदाराचे महिन्याकाठी 542 रुपयांची बचत होणार आहे. स्टेट बॅंकेने सणासुदीच्या दिवसात मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर दिली आहे. म्हणजेच 1 नोव्हेंबर, 2016 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत ही ऑफर वैध राहणार आहे, असे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात स्टेट बॅंकेचा शेअर 252.45 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 5.95 रुपयांची म्हणजेच 2.30 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार बॅंकेचे रु.195,583.17 कोटींचे बाजारभांडवल आहे. एक रुपया दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 148.30 रुपयांची नीचांकी तर 271.55 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

Web Title: SBI interest rate down