बँकेच्या चुकीने UPSCची मुख्य परीक्षा हुकली, SBI तरुणाला देणार ७ लाखांची भरपाई; काय घडलं?

बँकेच्या चुकीमुळे युपीएससीची मुख्य परीक्षा हुकल्यानंतर ग्राहक न्यायालयाने एसबीआयला दणका दिला आहे. तरुणाला ७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
SBI to Pay ₹7 Lakh to UPSC Aspirant Who Missed Exam Due to Bank’s Mistake

SBI to Pay ₹7 Lakh to UPSC Aspirant Who Missed Exam Due to Bank’s Mistake

Esakal

Updated on

बँकेच्या चुकीमुळे तरुणाला युपीएससीची मुख्य परीक्षा देता आली नाही. या प्रकरणी तरुणाने ग्राहक न्यायालयात बँकेविरुद्ध धाव घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती. ग्राहक न्यायालयाने या प्रकरणी बँकेची चूक असल्याचं सांगत तरुणाला नुकसान भरपाई म्हणून ७ लाख रुपये देण्याचा आदेश दिलाय. पीडित तरुणाने मुख्य परीक्षेसाठी एसबीआयच्या शाखेत २५५ रुपये जमा केले. पण बँकेच्या चुकीमुळे युपीएससीच्या खात्यात पैसे गेले नाही. परिणामी तरुणाला युपीएससीची मुख्य परीक्षा देता आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com