लखीमपूर हिंसाचार : न्या. राकेशकुमार जैन यांच्या देखरेखीखाली होणार तपास; SCकडून नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लखीमपूर हिंसाचार : न्या. राकेशकुमार जैन यांच्या देखरेखीखाली होणार तपास

लखीमपूर हिंसाचार : न्या. राकेशकुमार जैन यांच्या देखरेखीखाली होणार तपास

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणाचा तपास आता पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे माजी न्या. राकेशकुमार जैन यांच्या देखरेखीखाली होणार आहे. हा तपास निष्पक्ष व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडून जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे वाहनाच्या ताफ्याखाली चिरडल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र यातील मुख्य आरोपी आहेत.

नव्या SIT टीमसाठी घातल्या 'या' अटी

न्या. एन. व्ही. रमणा, न्या. सुर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठानं बुधवारी याप्रकरणाची सुनावणी करताना म्हटलं की, "निष्पक्षतेची हमी, पारदर्शकता आणि पूर्णतः निष्पक्ष तपासासाठी निवृत्त हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे." खंडपीठाने असंही म्हटलं आहे की, आदल्या दिवशी न्यायालयाने सुचविल्याप्रमाणे यूपी सरकारने सादर केलेल्या यूपी केडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट करून विशेष तपास पथकाची पुनर्रचना करण्याचा आदेश पारित करण्यात येतील.

यूपी पोलिसांच्या SITमध्ये सुचवल्या होत्या सुधारणा

खंडपीठानं यावेळी यूपी पोलिसांनी तपासासाठी तयार केलेल्या पथकामध्ये सुधारणा करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. कारण या पथकात प्रामुख्याने लखीमपूर खिरी भागातील उप निरिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला निर्देष दिले की SIT साठी सरकारनं अशा आपीएस अधिकाऱ्यांची नावे कोर्टाला सांगावीत जे मूळचे यूपीचे नाहीत परंतू यूपी केडरमध्ये काम करत आहेत.

हेही वाचा: संसदेत क्वालिटी डिबेट व्हावं, राजकीय चिखलफेक नको - PM मोदी

दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी इतर राज्यातील निवृत्त हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार कोर्टानं आज ही नियुक्ती जाहीर केली.

loading image
go to top