Cheetah Death: सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला खडसावलं; चित्त्यांच्या मृत्यूवर व्यक्त केली चिंता

कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली
Cheetah Death
Cheetah Death

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. तसेच, केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला खडसावलं आहे. (After 3 Deaths Supreme Court Suggests Moving Cheetahs To Rajasthan and maharashtra)

दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून आलेल्या चित्यांपैकी तिसऱ्या चित्याचा मृत्यू झाला आहे. भारतात 20 चिते आणण्यात आले होते. दोन महिन्यात तीन चित्त्यांचा मृत्यू झाल्याने सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठानं किडनीच्या आजारानं ग्रस्त असलेली मादी चित्ता भारत सरकारनं का स्विकारली? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे.(Latest Marathi News)

न्यायमूर्ती गवई म्हणाले की, "चित्ते बऱ्याच काळानंतर भारतात आणले गेले. त्यांना एकाच ठिकाणी ठेवल्यास प्रत्येकाला धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा पर्यायी अभयारण्यात बंदोबस्त करण्याचा विचार व्हायला हवा. मग ते मध्य प्रदेशातील अभयारण्यात किंवा राजस्थान, महाराष्ट्रातील अभयारण्यात." (Latest Marathi News)

Cheetah Death
Political News : उपमुख्यमंत्रिपदी दलित नेत्याची निवड करा, अन्यथा..; डीकेंची निवड होताच बड्या नेत्याचा थेट इशारा

केंद्र सराकरानं मांडली भूमिका

3 चित्त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे. मादी चित्त्यानं चार बछड्यांना जन्म दिल्याचंही सरकारनं सांगितलं. चित्ता प्रकल्पाचं हे मोठं यश आहे. कुनोच्या वातावरणात चित्ते आरामात राहतात. एका चित्त्याचा आजारानं मृत्यू झाला. तर इतरांचा मारामारीत जखमी होऊन मृत्यू झाल्याचंही सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं.  (Latest Marathi News)

नामिबियातून चिते भारतात

गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या सप्टेंबर महिन्यात नामिबियातून (Namibia) विशेष विमानाने चित्यांना भारतात आणण्यात आले होतं. त्यानंतर ग्वाल्हेरमधून चित्यांना हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. तिथून चित्त्यांची कुनो नॅशनल पार्कामध्ये रवानगी करण्यात आली.

सुरुवातीला आणण्यात आलेल्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते होते. 3 नर चित्यांमध्ये 2 सख्खे भाऊ असून त्यांचं वय साडेपाच वर्ष आहे. तिसऱ्या नर चित्याचं वय साडे चार वर्ष आहे. तसंच 5 मादी चित्त्यांचं वय 2 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत आहे. या चित्यांचं आयुष्य जास्तीत जास्त 12 वर्षे असते, अशी माहिती देण्यात आली आहे.

Cheetah Death
Weather Update : अंगाची लाही लाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, तापमानाची रेकॉर्ड ब्रेकच्या दिशेने वाटचाल

1948 मध्ये छत्तीसगडमधील साल जंगलात शेवटचा चित्ता दिसला होता. मोठ्या प्रमाणात शिकारीमुळे देशातून नामशेष झालेल्या चित्ताला परत आणून भारत पर्यावरणीय असंतुलन दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचं मोदी सरकारने सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com