SC
SC sakal

GATE 2022 रद्द करण्यास SC चा नकार, नियोजित वेळेतच होणार परीक्षा

गेट 2022 परीक्षा शनिवारपासून 200 केंद्रांवर होणार आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) गेट 2022 (GATE 2022 ) परीक्षा पुढे ढकलण्यास नकार देत परीक्षा नियोजित तारखेलाच होतील, असे आदेश दिले आहेत. गेट 2022 परीक्षा 48 तास आधी पुढे ढकलल्याने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होईल तसेच यामुळे अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेटची परीक्षा 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारीलाच ठरल्याप्रमाणेच घेतली जाणार असल्याचे न्यायलयाने म्हटले आहे. (SC Declines To Postpone GATE 2022 Exam)

गेट 2022 फेब्रुवारी महिन्यात 5, 6, 12 आणि 13 तारखेला होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकेत (Petition) विद्यार्थ्यांनी कोविड-19 (Covid 19) चा हवाला देत GATE 2022 परीक्षा पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान, न्यायालयाने यावर निर्णय देत GATE 2022 परीक्षा पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार दिला असून, परीक्षा नियोजित तारखेला म्हणजे 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारीलाच घेतली जाणार आहे. (GATE 2020 latest News In Marathi )

SC
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना पुण्यात आणणार?

या वर्षीची परिक्षा IIT खरगपूर (IIT Kharagpur) आयोजित करत असून, GATE 2022 साठी प्रवेशपत्र IIT खरगपूरतर्फे जारी करण्यात आले आहेत. उमेदवार IIT खरगपूरच्या अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वरून त्यांचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करू शकणार आहेत. गेट 2022 परीक्षा शनिवारपासून 200 केंद्रांवर होणार आहे. या वर्षीच्या गेट 2022 च्या परीक्षेसाठी 9 लाख विद्यार्थी बसले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com