BJP I स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचनेचा 'मविआ'चा निर्णय रद्द करा - बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule latest news

या प्रभाग रचना, गन रचना सदोष आहेत त्यामुळे त्या रद्द करून नव्याने करण्यात याव्या, भाजपची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचनेचा 'मविआ'चा निर्णय रद्द करा - बावनकुळे

मागील काही दिवसांपासून राज्यातील घडामोडींचा वेग वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय बदलांनी वेग घेतला आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील नेत्यांचे एकमेकांवर टिपण्णी सुरु आहे. दरम्यान, शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. दरम्यान, भाजपकडून आता आणखी एका निर्णयाची मागणी होत आहे.

भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर महाविकास आघाडीकडून यांनी जोरदार टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा: गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर..., केसरकरांनी खडसावलं

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना बावनुकळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करावी. या प्रभाग रचना, गन रचना सदोष आहेत त्यामुळे त्या रद्द करून नव्याने करण्यात याव्या. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रभाग रचना या अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून घेतल्याने त्यावर हजारो हरकती आल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्या तपासून पुन्हा रचना कराव्या अशी मागणी केली आहे. ते झाल्याशिवाय कुठलीही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी भाजपाने केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार स्थापन होण्याआधीच इतकी घाई कशासाठी? असा सवाल केला आहे. या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबई : माजी पोलीस आयुक्तांच्या अडचणीत वाढ; CBI कडून तीन गुन्हे दाखल

Web Title: Chandrashekhar Bawankule Demand Of Ward Formation Local Bodies Cancelled Letter To Election Commission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top