
मुंबई लोकल साखळी स्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं होतं. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली असून पुढील सुनावणीची तारीख ठरवण्याचे आदेश दिले आहेत. पुढच्या सुनावणीला सर्व पक्षांना सविस्तर बाजू मांडण्यास सांगण्यात आलंय.