PM Care Fund च्या चौकशीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास SC चा नकार

pm care fund
pm care fundpm care fund

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पीएम-केअर्स फंडातील खर्चाचा तपशील आणि ऑडिट करण्याची मागणी करणारी याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. पीएम केअर्स फंडातील खर्चाचा तपशील जाहीर करावा तसंच भारताचे नियंत्रक आणि महालेख परीक्षकांद्वारे या खर्चाचा ऑडिट करण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली होती.

pm care fund
परीक्षेमध्ये घोटाळा कराल, तर १० कोटींचा दंड अन् १० वर्ष तुरुंगवास

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्याठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले. याचिकाकर्ते वकिल म्हणाले की, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असलेली याचिका फेटाळून लावली. तसंच फक्त निकालावर अवलंबून राहणं योग्य नाही असं नमूद केलं.

pm care fund
दिव्यांग व्यक्तींना UPSC निवड प्रक्रियेत तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करता येणार

दरम्यान, खंडपीठाच्या न्यायाधीशांनी यावेळी म्हटलं की, "सर्व मुद्द्यांचा विचार केला गेला नाही असं तुमचं म्हणणं बरोबर असू शकतं. तुम्ही युक्तिवाद केला होता की, नाही हे आम्हाला माहित नाही. तुम्ही जा आणि पुनर्विचार याचिका दाखल करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com