स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

अयोध्येतील रामजन्म भूमिबाबत भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अयोध्येत पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी स्वामी यांनी याचिकेद्वारे केली होती.

नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्म भूमिबाबत भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अयोध्येत पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी स्वामी यांनी याचिकेद्वारे केली होती. 

सरन्यायधीश दीपक मिश्रा आणि न्यायधीश ए. एम. खानविलकर, न्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने अयोध्येसंदर्भातील स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यासंदर्भात केलेल्या युक्तिवादाचा विचार केला. स्वामी यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली होती. हा खटला मालमत्तेच्या अधिकारासंदर्भात नसून, पूजा करण्याचा अधिकार मागणारा आहे. प्रत्येक हिंदूना पूजा करण्याचा अधिकार असून, तो मालमत्तेच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: SC Rejects All Pleas Including That Of BJP Leader Subramanian Swamy