सुदर्शनच्या ‘बिनधास्त बोल’ला ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

न्यायालयाने सुनावणीच्या वेळी या कार्यक्रमाच्या काही क्लिप देखील पाहिल्या आणि त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रसारण १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत थांबविण्यात यावेत अशा सूचना दिल्या.

नवी दिल्ली - देशातील एका विशिष्ट समुदायाच्या सनदी सेवांमधील प्रवेशावर आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या  सुदर्शन वृत्तवाहिनीवरील ‘बिनदास्त बोल’ या  वादग्रस्त कार्यक्रमाच्या प्रसारणाला सर्वोच्च न्यायालयाने आज ब्रेक लावला.  न्या. डी. वाय.चंद्रचूड आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने याआधी झालेल्या सुनावणीत या वाहिनीवरून याआधीच प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह कार्यक्रमाच्या काही भागांवर बंदी घालण्यास नकार दिला होता.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशा कार्यक्रमांचा दर्जा तपासण्यासाठी पाच नागरिकांची समिती स्थापन केली जावी असे निर्देशही न्यायालयाने दिले. आज न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ अनुप जॉर्ज चौधरी यांनी आजमितीस सनदी सेवेमध्ये २९२ मुस्लिम अधिकारी असल्याचा दाखला न्यायालयात दिला. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी या कार्यक्रमाच्या काही क्लिप देखील पाहिल्या आणि त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रसारण १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत थांबविण्यात यावेत अशा सूचना दिल्या.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायालय म्हणाले
या कार्यक्रमामुळे ‘यूपीएससी’वर प्रश्‍नचिन्ह
कार्यक्रमांतील आरोपांना आधार नाही
देशात पत्रकारांना वेगळे स्वातंत्र्य दिलेले नाही
आपल्याकडे अमेरिकेसारखे वेगळे स्वातंत्र्य नाही
‘सुदर्शन’च्या कार्यक्रमातील भाष्य आक्षेपार्हच

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC suspended the broadcast of the controversial program Bindast Bol on Sudarshan News Channel